विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा लूक, वायुदल प्रमुखांसोबत लढाऊ विमानाचं उड्डान

अभिनंदन वर्तमान देशसेवेसाठी सज्ज...  

Updated: Sep 2, 2019, 01:40 PM IST
विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा लूक, वायुदल प्रमुखांसोबत लढाऊ विमानाचं उड्डान title=

पठानकोट : वायुदलाचे प्रमुख बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी आज पठानकोट एअरबेस येथून मिग -21 या लढाऊ विमानाचं उड्डान केलं. या दरम्यान अभिनंदन नव्या लूकमध्ये दिसले. याच वर्षी 27 फेब्रवारीला अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करत त्यांचं एक विमान उडवलं होतं. अभिनंदन यांनी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 हे विमान नष्ट केलं.

पण या दरम्यान त्यांचं विमान देखील क्रॅश झालं. त्यानंतर ते विमानातून बाहेर पडले आणि पीओकेमध्ये उतरले. पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर भारताच्या दबावानंतर त्यांची सूटका करण्यात आली. 

अभिनंदन यांची मेडिकल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर ते आज पुन्हा एकदा लढाऊ विमान चालवण्यासाठी आणि देशाच्या सेवेत सज्ज झाले आहेत. यावेळी वायुसेनेचे प्रमुख हे देखील त्यांच्या सोबत विमानात होते.

एयरफोर्स चीफ के साथ विंग कमांडर अभिनंदन ने उड़ाया MIG 21

बालाकोट एयरस्ट्राईक करत आपली ताकद दाखवणाऱ्या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान देशातील अनेकांसाठी हिरो ठरले.  पाकिस्तान यांना सरकारने वीरचक्र देऊन सन्मानित केलं. लवकरच त्यांच्यावर एक सिनेमा देखील बनणार आहे. बॉलिवुड अभिनेता विवेक ऑबेरॉय याला सिनेमा बवण्याची परवानगी मिळाली आहे.

सिनेमाची शूटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.