'माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा'

पीडित मुलीच्या आईची उद्विग्न भावना  

Updated: Dec 1, 2019, 11:46 AM IST
'माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा' title=

मुंबई : हैदराबादमध्ये गुरूवारी झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर देशातील मुलींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हे प्रकार कधी संपतील आणि देशातील मुली कधी सुरक्षित होतील असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. निर्भया प्रकरणाला ७ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर देखील बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आणि आता पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर ओढावलेला हा भयानक प्रसंग. दिवसागणित बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे. 

तेलांगना महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित राज्य
नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्यूरेनुसार, १८ ते ३० वयोगटातील मुलींसाठी तेलांगना सर्वाधिक असुरक्षित राज्य आहे. वर्ष २०१७ पासुन झालेल्या बलात्काराच्या घटनेत ९१ टक्के मुली १८ ते ३० वयोगटातील आहे. 

पीडित तरूणीची बहिण म्हणते, ती खूप घाबरली होती
कुटुंबातील सदस्यांनी सांगिल्याप्रमाणे, पीडित तरूणीने आपल्या बहिणीला कॉल केला. तेव्हा ती फार घाबरली होती. रस्त्यात तिची मोटार सायकल पंक्चर झाली. म्हणून मोटार सायकल तिकडेच ठेवून कॅबने तिला घरी येण्याचा सल्ला दिला.  टोल प्लाझाजवळ वाट पाहणं पीडितेला विचित्र वाटत होत. तिथे असलेली माणसं तिच्याकडे वाईट नजरेने पाहात असल्याचे लक्षात येताच ती घबरली होती. सहा मिनिटांनंतर फोन कट झाला. जेव्हा पीडित तरूणी ११ वाजेपर्यंत घरी पोहचू शकली नाही, तेव्हा कुटुंबाने ती हरवली असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. 

शेतकर्‍याने जळलेला मृतदेह पाहिला
घटनास्थळापसून ३० किमी अंतरावर एका शेतकऱ्याला मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्या शेतकऱ्याला मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी अर्धजळालेल्या स्कार्फ आणि सोनेरी रंगाच्या माळेवरून पीडीतेची ओळख पटली. शिवाय आजूबाजूला मद्याच्या बाटल्या देखील मिळाल्या. 

चार आरोपी अटक 
सामुहिक बलात्काराप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर होता. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं आहेत. चार आरोपिंनी कट रचत हे निर्घृण कृत्य केलं आहे. नराधमांनी पीडित मुलीची मोटर सायकल पंक्चर केली होती. त्यानंतर तिचं अपहरन करून बलात्कार आणि हत्या करण्यात आली. रंगा रेड्डी जिल्ह्यातील चटनपल्ली उड्डाणपूलाखाली पीडित तरूणीला जाळण्यात आलं. पोलिसांनी पीडित तरूणीची मोटर सायकल, कपडे, चप्पल घटनास्थळावरून हस्तगत कले.

कुटुंबाचा आरोप, पोलिसांनी दुर्लक्ष केलं म्हणून...
जर पोलिसांनी वेळेत योग्य पाऊल उचलले असते, तर आमची मुलगी आज आमच्यात असती असं वक्तव्य पीडित तरूणीच्या कुटुंबाने केलं. पीडितेची बहिण तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता, तो भाग आमच्या क्षेत्रात येत नाही असे सांगत सायबराबाद पोलिसांनी तिला शमशाबाद पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आले. 'माझी मुगली निरपराध होती, तिच्यासोबत असं कृत्य केलेल्या नराधमांना जिवंत जाळा' आशी उद्विग्न भावना पीडित तरूणीच्या आईने व्यक्त केली. 

नराधमांना फाशी द्या
देशातील लोकांचा आक्रोश आता वाढत आहे. लोक रत्यावर उतरून त्या नराधमांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात यावी अशी मागणी करत आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणाची तुलना 'निर्भया' प्रकरणासोबत होत आहे.