बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित

Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 5, 2024, 01:03 PM IST
बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित title=
शहराच्या मध्यवर्ती भागात घडला हा प्रकार

Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: केरळमधील कोल्लम येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर आणि तिच्या मित्रावर पेट्रोल ओतून दोघांना पेटून दिलं आहे. ज्यावेळी या व्यक्तीने दोघांवर पेट्रोल टाकून आग लावली तेव्हा हे दोघे कारने प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये आरोपीची पत्नी अनिलाचा मृत्यू झाला असून तिचा मित्र सोनी हा गंभीर जखमी झाला आहे. सोनीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हा सारा प्रकार बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोल्लममधील चिकमंगळुरु येथे घडला. 

नेमकं घडलं काय?

या प्रकरणामध्ये ईस्ट पोलिसांनी अनिलाचा पती पद्मराजला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या पद्मराजची चौकशी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मराजने अनिला आणि सोनी एकत्र प्रवास करत असलेली कार थांबवली. या दोघांनी काही समजण्याआधीच पद्मराजने त्यांच्या कारवर पेट्रोल ओतलं आणि कार पेटवून दिली. कारला आग लावल्यानंतर थोडावेळ तिथे थांबवल्यावर आपण पकडले जाऊन या भितीने पद्मराज तिथून पळून गेला. चिकमंगळुरु शहरामधील रेल्वे स्थानकाजवळ शहराच्या मध्यवर्ती भागात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा सारा प्रकार घडला. अनिला ही कोल्लम येथे एक बेकरी चालवायची. या बेकरीची मालकी अनिलाकडेच होती मात्र त्यामध्ये काही वाटा सोनीचा होता. 

पत्नी आणि त्या मित्राचं कनेक्शन काय?

सोनी आणि अनिला हे एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. मात्र मोठा वाटा हा अनिलाच्या नावावर होता. अनिला आणि सोनीच्या नातेसंबंधांवर शंका घेत तिच्या पतीने हे दोघे बसलेली कार जाळल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. कारला आग लावण्याआधी दोघांना कार बाहेर पडण्याचाही वेळ मिळाला नाही. आधी दोघेही गांगरुन गेले. कसेबसे ते बाहेर पडले तेव्हा त्यांना बऱ्याच ठिकाणी चटके बसले होते. पोलीस आणि स्थानिक अग्नीशामन दलला फोन करुन माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारची आग विजवली. त्यानंतर अनिला आणि सोनीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीर जखमी झालेल्या अनिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोनीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी पद्मराजविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 

या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न

पद्मराजने नेमकं हे असं का केलं? त्याच्या डोक्यात नक्की काय शिजत होतं? अनिला आणि सोनी यांच्याबरोबर त्याचा काही वाद होता का? पद्मराजला यामध्ये इतर कोणी मदत केली का? यासारख्या प्रश्नांची उत्तर सध्या पोलीस तपासामध्ये शोधत आहेत. पोलिसांकडून पद्मराजच्या कोठडीचीही मागणी कोर्टासमोर केली जाणार आहे.