तुमच्या Driving Licence चा पत्ता आता घरबसल्याच होणार अपडेट; कसं ते जाणून घ्या

Driving Licence Address Update :  तुमच्या ड्रायविंग लायसन्समध्ये असलेला पत्ता बदलायाचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्पा मार्ग सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची देखील गरज पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात... 

Updated: Jul 30, 2022, 03:29 PM IST
तुमच्या Driving Licence चा पत्ता आता घरबसल्याच होणार अपडेट; कसं ते जाणून घ्या title=

Driving Licence Address Update :  ड्रायविंग लायसन्स हे असं डॉक्यूमेंट आहे, जे गाडी चालवताना कायम सोबत ठेवावं लागतं. अनेकदा याच ड्रायविंग लायसन्सचा उपयोग हा सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी किंवा काही वेळातर महत्वपुर्ण डॉक्यूमेंट म्हणून वापर केला जातो. असं असताना ज्या पद्धतीने आपण स्वत:ला अपडेट ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या ड्रायविंग लायसन्सला देखील इतर डॉक्यूमेंट प्रमाणेच अपडेट करावचं लागतं. 

'या' वेबसाइटने करा तुमच्या ड्रायविंग लायसन्समध्ये बदल...

तुम्हाला अगदी सहज सेवा मिळावी म्हणून भारत सरकारने एमपरिवहन (mParivahan) वेबसाइट लाँच केली आहे. यामुळे आता तुमच्या ड्रायविंग लायसन्सचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला क्षेत्रीय परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओला (RTO) जाण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही घरी बसुन तुमच्या ड्रायविंग लायसन्सचा पत्ता बदलू शकता. तो नेमका कसा बदलायचा? या विषयी आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात...

ड्रायविंग लायसन्सचा पत्ता बदलताना 'या' स्टेप्स करा फॉलॉ...

Step 1 - सर्वात प्रथम भारत सरकारच्या parivahan.gov या वेबसाइटवर जा.
Step 2 - ड्रायविंग लायसन्स संबंधीच्या सेवांवर जाऊन Address Change हा ऑप्शन निवडा.
Step 3 - ड्रायविंग लायसन्सच्या माहितीवर क्लिक करा.
Step 4 - तुमच्या जवळच्या आरटीओ कार्यालयाची निवड करा.
Step 5 -  Address Change या ऑप्शनची निवड करा.
Step 6 - जुना आणि नवा पत्ता या सांगितलेल्या ठिकाणी भरा.
Step 7 - 200 रुपयांची फी भरा.
Step 8 - ड्रायविंग लायसन्सचा नवा पत्ता अपडेट होईल.