UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?

UPSC Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा सर्वात आव्हानत्मक परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. काहींच्या प्रयत्नाला लगेच यश मिळतं, तर काहींना मात्र प्रयत्न करुनही यशाची चव चाखता येत नाही. दरम्यान युपीएससी 2024 च्या निकालांची घोषणा झाली आहे. आदित्य श्रीवास्तवने देशभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये डी अनन्या रेड्डी पहिली आली आहे. upsc.gov.in वर निकाल अपलोड करण्यात आले आहेत. 

आदित्य श्रीवास्तव टॉपर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनिमेशन प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये डी अन्यया रेड्डी टॉपर ठरली आहे. मागील दोन वर्षांपासून युपीएससी परीक्षेत मुलगी बाजी मारत पहिला क्रमांक पटकावत होती. पण यावर्षी मुलाने बाजी मारली आहे. 

युपीएससी परीक्षेत टॉप करणारा आदित्य श्रीवास्तव मुळचा उत्तर प्रदेशच्या लखनऊचा आहे. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं आहे. युपीएससी मेन्समध्ये त्याने ऑप्शनलमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर विषय निवडला होता. आदित्यने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. 

श्रेणीनुसार समजून घ्या टॉपर्सची यादी

श्रेणीनिहाय युपीएससी टॉपर्स यादी प्रत्येक श्रेणीमध्ये किती उमेदवार निवडले गेले हे दाखवतं. युपुीएससी सरकारने अनिवार्य केलेलं आरक्षण निकष लागू करतं ज्याच्या आधारावर यावर्षी प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची संख्या बदलू शकते.

IAS होण्यासाठी कोणत्या श्रेणीत किती रँकिंग हवी?

युपीएससी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचं IAS म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं स्वप्न असतं. पण त्यासाठी तुमची रँकिंग महत्त्वाची असते. तुमच्या रँकिंगच्या आधारे तुम्ही IAS साठी निवडले जाणार की IFS, IRS याचा निर्णय होतो. येथे IAS हे सर्वात मोठं पद असतं. 

म्हणजे सांगायचं झाल्यास तर तुम्ही सामान्य श्रेणीतून असाल तर 90 पर्यंत रँकिंग असावी लागते. तसंच EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुबळे घटक आणि ओबीसींसाठी ही रँकिंग 300 पर्यंत आहे. तर SC\ST साठी 450 आहे. 

पोस्ट प्रमाणे युपीएससी निकाल 2024

युपीएससी टॉपर 2024 यादीसह श्रेणीनुसार निवडलेले उमेदवार आणि राखीव यादीसह UPSC पोस्टनिहाय ब्रेकअप देखील जाहीर करतं. यावर्षी ते कसं आहे समजून घ्या. 

IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो?

IAS अधिकाऱ्यापेक्षा कॅबिनेट सेक्रेटरी हे पद मोठं असतं. भारत सरकारचे ते सर्वोच्च रँकिंग अधिकारी असतात. केंद्र स्तरावर त्यांना आयएएस अधिकाऱ्यांचा बॉस मानलं जातं. कॅबिनेट सेक्रेटरी थेट पंतप्रधानांकडे रिपोर्ट करत असतात. तसंच राज्य स्तरावर कॅबिनेट सेक्रेटरींप्रमाणे चीफ सेक्रेटरी सर्वात मोठे अधिकारी असतात. हे राज्याचे सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ आयएएस असतात. राज्य स्तरावर त्यांना आयएएस अधिकाऱ्यांचं प्रमुख मानलं जातं. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
How much Ranking UPSC Aspirants need to become IAS officer
News Source: 
Home Title: 

UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?

 

UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, April 16, 2024 - 17:38
Created By: 
Shivraj Yadav
Updated By: 
Shivraj Yadav
Published By: 
Shivraj Yadav
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
329