RBI On Adani Group Case: अमेरिकेच्या शॉर्ट-सेलिंग फर्म असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) नकारात्मक अहवालामुळे सध्या भारतीय मार्केटमध्ये (Share Market) मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे. अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani Group Shares) कोसळले. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अदानी समुहाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. त्याला कारण ठरतंय, आयबीआयची (RBI) कारवाई... (how much loan has been given to adani group give information urgently rbi instruction to all banks)
अदानीचे शेअर्स खाली आल्याने अनेकांना गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) म्हणजेच आयबीआयने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. बँकेचे नियमन करणाऱ्याने आयबीआयने सर्व बँकांकडून अहवाल (RBI instruction to all banks) मागवला आहे. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आता गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
India's central bank (Reserve Bank of India) has asked local banks for details of their exposure to the Adani group of companies, government and banking sources, reports Reuters pic.twitter.com/EHxDfVNmhD
— ANI (@ANI) February 2, 2023
अदानी एंटरप्रायझेसने बुधवारी 20 हजार कोटींचा एफपीओ मागे (Adani Enterprises FPO) घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मंगळवारी तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यानंतर अदानी समुहाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. बाजारातील अस्थिरता पाहता FPO बरोबर पुढं जाणं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं मत अदानीच्या बोर्डाने मांडलं आहे.
दरम्यान, आयबीआयच्या (RBI) निर्णयानंतर शेअर बाजारात याचे पडसाद उमटल्याचं पहायला मिळालं. ADANI ENT मध्ये तब्बल 24 टक्क्यांची घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. तर इतर कंपन्यांना देखील मोठा फटका बसलाय. अदानी पोर्टम (Adani Ports)ध्ये देखील 5 टक्केची घट दिसून आली आहे. त्यामुळे आता बाजारात खळबळ माजल्याचं पहायला मिळतंय.