उकडलेल्या अंड्याला एवढ्या वेळेत खा, ते नेमकं किती वेळेनंतर खराब होतं पाहा?

अंड हे आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो.

Updated: Jul 18, 2021, 09:47 PM IST
उकडलेल्या अंड्याला एवढ्या वेळेत खा, ते नेमकं किती वेळेनंतर खराब होतं पाहा? title=

मुंबई : सध्या लोकांनी न्याहारीमध्ये अंड्यांना प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे. अंड्यांना उकडून किंवा त्यावर बऱ्याच गोष्टी गार्निश केल्यावर बहुतेक लोकांना ते खायला आवडते. उकडलेले अंडे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे आणि ते प्रथिनांचा चांगला स्रोत देखील मानला जातो. उकडलेले अंडे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि म्हणूनच लोकांना बहुतेक वेळा जिमनंतर उकडलेले अंडे खायला सांगितले जाते. तुम्ही जर उकडलेली अंडी दररोज खात असाल तर, तुम्ही उकडलेले अंडी किती काळापर्यंत खायला पाहिजे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

अंड्याचे बरेच फायदे आहेत

अंड हे आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. हे बर्‍याच पौष्टिक पदार्थांसह समृद्ध आहे, जे शरीराला चपळ बनवण्यात मदत करते. अंड हे प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे ए, बी 6, बी 12, फोलेट, अमीनोऍसिडस्, फॉस्फरस आणि सेलेनियममध्ये इसेंशियल अनसॅचुरेटेड फॅटी एसिड्स (लिनोलिक, ओलिक एसिड)आढळतात.

जास्त उकडलेली अंडी प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. आपण त्यातून एक सोपा स्नॅक आणि हलका-फुलका आहार देखील तयार करू शकता.

अंड्यांना नेहमीच ताजं ठेवण्यास आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची योग्यरित्या साठवणूक करणे महत्वाचे आहे. रेफ्रिजरेटिंग, फ्रीझिंग आणि इतर काही अशा पद्धती आहेत, ज्या तुम्हाला अंडी सुरक्षितपणे साठवून ठेवण्यात मदत करतात. या पद्धतीं केवळ अंड्यांची चव टिकवण्यात मदत करत नाही, तर त्यांचे पोषकद्रव्यही टिकून ठेवते. 

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की? ही उकडलेली अंडी किती काळाने आणि कशी खावी?
जास्त उकडलेली (Hard Boiled egg) अंडी तुम्ही 5 ते 7 दिवसांपर्यंत ठेऊ शकता आणि जर तुम्ही अंडी कमी उकडलीत, तर त्याला 2 दिवसांच्या आत खावे लागेल. जर अंड उकडताना त्याचे कवच तुटले तर अशी अंडी 2 ते 3 दिवसांच्या आत खावी.

जेव्हा आपण उकडलेले अंडी बर्‍याच काळासाठी ठेऊन देता, तेव्हा त्यांचे पीएच बदलते आणि यामुळे वास येऊ लागतो. अंडी उकडल्यानंतर लगेचच त्यांना थंड पाण्यात ठेवा. जेव्हा अंडी थंड होतात, त्यांना स्वच्छ कपड्याने पुसा, वाळवा आणि ताबडतोब रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. असे केल्याने बॅक्टेरिया आणि इतर संक्रमण अंड्यात येऊ शकणार नाहीत.

फ्रीजमध्ये ठेवणे महत्वाचे

अंडी थंड झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर फ्रीजमध्ये ठेवा. जर अंडी त्वरित फ्रीजमध्ये ठेवली गेली नाहीत, तर ते खाणे धोकादायक ठरू शकते. कारण जास्त तापमान अंड्यांमधील साल्मोनेला सारख्या जीवाणूंसाठी असुरक्षित बनवते. बाहेर ठेवलेली अंडी २ तास किंवा त्याहून अधिक काळ ठेवू नका. जेव्हा अंडी खायची असतील तर त्याला खाण्यापूर्वी फ्रिजमधून बाहेर काढा. जर अंडी 2 तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवलेली असतील तर आपण ती खाऊ नये.