मुंबई : ईपीएओ द्वारा आता पीएफधारकांना १२ क्रमांकाचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.
पण या ऑनलाईन सुविधेचा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप गाईड पहा.
युएएन अकाऊंट सोबत (UAN account)आधार क्रमांक लिंक कसा कराल ?
www.epfindia.gov.in या ईपीएओच्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस, त्यानंतर ई केवायसी पोर्टल व पुढे लिंक युएएन आधारवर क्लिक करा.
या सुविधेचा वापर करताना तुम्हांला युएएननंबर देणे गरजेचे आहे.
यानंतर ओटीपी नंबर तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. ( UAN क्रमांकाशी सलग्न क्रमांकाशी)
ओटीपी नंबर व्हेरिफाईड झाल्यानंतर तुमचा आधार नंबर देण्याची सोय उपलब्ध होईल. याकरिता ओटीपी क्रमांक आधार कार्डाशी सलग्न मोबाईल क्रमांक आणि इमेलवर दिला जाईल.
ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर युएएन क्रमांकातील माहिती आणि आधारशी मिळल्यास युएएन क्रमांक आधारकार्डाशी जोडले जाते.
लिंकींग यशस्वी झाल्यानंतर ईपीएफओ सदस्य ऑनलाईन ईपीएफओ सर्व्हिसचे फायदे घेऊ शकतात.