हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच सर्वात आधी करा 'हे' काम, नाहीतर होईल पश्चाताप!

आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे कधी कामासाठी तर कधी सहजच फिरायला जाताता आणि त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागतं.

Updated: Aug 3, 2022, 02:55 PM IST
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच सर्वात आधी करा 'हे' काम, नाहीतर होईल पश्चाताप! title=

मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे कधी कामासाठी तर कधी सहजच फिरायला जाताता आणि त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागतं. यासाठी आपण कधी थेट हॉटेलवर जाऊन तर कधी ऑनलाईन रुम बुक करतो. असावेळी बऱ्यादा अनेकांसोबत असं घडतं की, त्यांना दाखवली वेगळी खोली जाते आणि खरोखर वेगळीच खोली मिळते. तसेच बऱ्याचदा हॉटेलच्या खोलीत गेल्यावर आपल्याला ती खोली खूप स्वच्छ दिसते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉटेलच्या खोल्या खरोखरच हायजिनिक असतात का?

हॉटेलच्या खोलीत अस्वच्छता असल्याने तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित राहू शकाल.

हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर, प्रथम आपण बाथरूम तपासा. अनेक वेळा हाऊसकीपिंग कर्मचारी तुमचे टॉयलेट व्यवस्थित साफ करत नाहीत. अशा स्थितीत अनेक प्रकारचे आजार पसरू शकतात. म्हणून, हॉटेलच्या खोलीत बाथरूम वापरण्यापूर्वी, बाथरूमच्या फ्लोअरवर गरम पाण्याचा एक मग शिंपडा आणि ते स्वच्छ आहे की नाही हे तपासा.

हॉटेलचे ग्लास तपासा

हॉटेलच्या खोलीत पिण्याच्या पाण्यासाठी दिलेला ग्लास जरूर तपासा. हे ग्लास खोलीतील सर्वात घाणेरड्या गोष्टींपैकी एक असू शकतात. त्यात कोणत्याही प्रकारचे डाग किंवा कोणतेही चिन्ह असल्यास, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ते बदलण्यास सांगा. जर त्यात पाण्याच्या खुणा असतील जसे की बहुतेक भांडी हवेत कोरडे करताना येतात, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की एकतर ते साफ करा आणि मग वापरा किंवा मग ते बदलून घ्या.

टीव्ही आणि एसी रिमोट

हॉटेलच्या खोल्यांमध्ये असलेले टीव्ही आणि एसीचे रिमोटही काही वेळा अस्वच्छ असतात. यात अनेकांचे कोणतेही हात लागलेले असतात. 2020 मध्ये आलेल्या इनसाइड एडिशनच्या अहवालात असे म्हटले आहे की, हॉटेलच्या खोलीतील टीव्हीचा रिमोट इतका घाणेरडा आहे की केवळ कोविड-19 च नाही तर त्यात E.coli सारखे विषाणूही आढळले आहेत. त्यामुळे रिमोट वापरताना सॅनिटायझरचा वापर करा.