तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 26, 2017, 02:35 PM IST
तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...  title=

चंदीगड : साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

ही महिला न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही उपस्थित होती. ही महिला म्हणजे गुरमीतनं दत्तक घेतलेली मुलगी म्हणजेच हनीप्रीत सिंग इन्सान होती. 


हनीप्रीत सिंग

३५ वर्षांची हनीप्रीत गेल्या सात वर्षांपासून डेराप्रमुखसोबत आहे. गुरमीतची ती खास व्यक्ती मानली जाते. हनीप्रीत गुरमीत्चाय सर्व सिनेमांतही दिसलीय. 

डेरा प्रमुखाची परवानगी मिळाली तर डेराची कमान हनीप्रीत आपल्या हातात घेऊ शकते.