चंडीगढ : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसांने आपला गुन्हा कबूल केला आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
राम रहिमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंचकूलामध्ये हिंसा भडकवण्याचा हनीप्रीतवर आरोप आहे. या हिंसेत ३६ लोकांचा मृत्य़ू झाला होता. दुसरीकडे पोलीस चौकशीत हनीप्रीतचा ड्रायव्हर राकेशने खुलासा केलाय की, पंचकूलामध्ये दंगे घडवून आणण्यासाठी हनीप्रीतने मास्टर प्लॅन तयार केला होता.
सूत्रांनी दिलेल्या वॄत्तानुसार, हनीप्रीतच्या लॅपटॉपमध्ये हिंसेचा पूर्ण प्लॅन तयार करण्यात आलाय. हे हनीप्रीतच्या विरोधात ठोस पुरावा मानला जात आहे. पण अजूनही तो पोलिसांच्या हाती लागला नाहीये. पोलीस हनीप्रीतचा लॅपटॉप आणि मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बुधवारी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात सीबीआयने राम रहिमची साधारण ३ तास चौकशी केली. यादरम्यान, त्याने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. डेराशी निगडीत काही लोकांनी आरोप केले आहे की, राम रहिमने त्यांना नपुंसक केलंय.
देशद्रोहाचा आरोप असलेली हनीप्रीत तब्बल ३८ दिवस फरार राहिली होती. मंगळवारी पंचकूला कोर्टाने हनीप्रीत इंसां आणि सुखदीप कौर यांच्या पोलीस रिमांडमध्ये ३ दिवसांची वाढ केली आहे. आता ती पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहे.
पण चौकशीत हनीप्रीत काहीच माहिती देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुखदीप कौरने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना चौकशीत दिशा मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघींना पोलिसांनी तब्बल ४०० प्रश्न विचारले. त्यातील केवळ ८५ प्रश्नांचेच हनीप्रीतने उत्तर दिलंय.