व्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये

Honey Trap: दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Jul 19, 2023, 05:49 PM IST
व्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये  title=

Honey Trap: सध्या हनी ट्रॅपची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुणांना यात अडकवले जाते. त्यानंतर ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. दरम्यान बिहारमध्ये हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये व्हॉट्सअपवरील लिंक ओपन करणे तरुणाला महागात पडले आहे. बेलदौरमध्ये जेडीयू आमदार पन्नालाल सिंह पटेल यांचा मुलगा नूतन पटेल हनीट्रॅपचा बळी ठरला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात अडकण्याचे प्रकार जोरात सुरु आहे. नूतन पटेल याला त्याच्याव्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक आली. त्यानंतर त्याच्या फोनवर एका मुलीचा नंबर आला. दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
 
तरुणीने नूतनशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलणे सुरू केले. आमदाराच्या मुलाने संभाषण सुरू करताच मुलीने कपडे काढण्यास सुरुवात केली. यानंतर काहीतरी विचित्र घडत असल्याचे नूतन पटेलच्या लक्षात आले. त्याने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. ब्लॅकमेल करणारी मुलगी येथे थांबली नाही. तिने तात्काळ नूतन पटेलला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

काही वेळाने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. नूतन पटेलने पैसे देणार नसल्याचे सांगताच समोरील व्यक्तीने त्यांना व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. नूतन पटेल यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

व्हिडिओ सेक्सटोर्शन प्रकरणांमध्ये वाढ

आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओ सेक्सटोर्शनची प्रकरणे सर्रास पाहायला मिळतात. तरुणांना यात अडकवण्यासाठी ब्लॅकमेलिंगचा खेळ खेळ खेळला जातो. अनेक प्रकरणांमध्ये या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जाते. तर काही प्रकरणांमध्ये आवश्यक माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशा प्रकरणात लष्कर आणि डीआरडीओचे कर्मचारीही अडकले आहेत. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना सतर्क रहा, चुकूनही कोणत्याही अनव्हेरीफाईड लिंकवर क्लिक करू नका. यात तुमची फसवणूक होऊ शकते.