'राम रहिम माझे वडिल, त्यांचे विरोधक मला मारून टाकतील'

 या याचिकेत हनीप्रीतने राम रहीम हा वडील असल्याचे म्हटले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 26, 2017, 06:09 PM IST
 'राम रहिम माझे वडिल, त्यांचे विरोधक मला मारून टाकतील'  title=

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयात हनिप्रीतच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याआधी हनीप्रीतचे वकील प्रदीप कुमार आर्य यांनी हनीप्रीतला आगाऊ जामीन देण्याकरिता सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हनीप्रीत यांच्या वकिलांनी दिलेल्या अटकपूर्व जामिनाची प्रत झी न्यूजकडे आहे. या याचिकेत हनीप्रीतने राम रहीम हा वडील असल्याचे म्हटले आहे.

मीडिया आणि काही लोकांनी माझ्या आणि वडिलांमधील नात्याचा चुकीचा अर्थ दाखविला आहे.तिने प्रसारमाध्यमांवर प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावला आहे. मी माझ्या वडिलांचा खूप आदर करते. हरियाणा पोलिसांना मला केवळ त्रासच द्यायचा आहे असे हनीप्रीतने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. मी तपासणीस पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही तिने म्हटले आहे.
मी न्यायालयात हजर होण्यास तयार आहे. पण राममहिमचे शत्रू मला मारून टाकतील अशी भिती तिने व्यक्त केली आहे.