जम्मू : दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याने राज्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.
या व्हिडिओमध्ये रियाज जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना देखील संबोधित करत आहे. राजकीय कार्यकर्त्यांना मारण्याऐवजी त्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकून त्यांना अंध करण्यास सांगत आहे.
रियाज याने सांगितले की, आगामी पंचायत निवडणुकीत ज्या ठिकाणी निवडणुकीत उभा राहिल त्याच्या बरोबर असंच केलं जाईल. रियाजचा त्याचा सहकारी दहशतवादी समीर सोबत बोलत असतांनाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
लोकांना पंचायत निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी तो दहशतवाद्यांचा उपयोग करेल असं देखील तो म्हणत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फेब्रुवारीमध्ये पंचायत निवडणूक होणारे आहेत.
राज्य सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी सुरक्षा दल देखील काम करत आहे.