नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीजकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.
हिमाचल प्रदेशच्या एकूण ६८ जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी अॅक्सिसने केलेल्या सर्व्हेचा एक्झिट पोल समोर आला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६८ जागांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३६ जागा मिळवल्या होत्या. तर, भाजपला अवघ्या २६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
मात्र, आता अॅक्सिसने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला हिमाचल प्रदेशात अच्छे दिन आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Himachal Pradesh seat share projection #ModiInvincible pic.twitter.com/N2coC7F0qY
— TIMES NOW (@TimesNow) December 14, 2017
गेल्या निवडणुकीत भाजपला हिमाचल प्रदेशात चाळीशीही गाठता आली नव्हती. मात्र, या निवडणुकीत पंन्नाशी क्रॉस करत जोरदार मुसंडी मारत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ५१ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाजप | काँग्रेस | इतर | एकूण जागा |
५१ | १७ | १ | ६८ |