HijabRow | शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाब बॅन संदर्भातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 'इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही' असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

Updated: Mar 15, 2022, 11:04 AM IST
HijabRow | शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय title=

बंगळुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाब बॅन संदर्भातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 'इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही' असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम काझी यांच्या खंडपीठाने उडुपीच्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी केली. या मुलींनी त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग असल्याने त्यांना शाळेच्या गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती