जयपूर : देशाच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक घडामोडी सध्या साऱ्या देशाचंच लक्ष वेधू लागल्या आहेत. त्यातच Rajasthan राजस्थानमध्ये सुरु असणारा सत्तासंघर्ष एका रंजक वळणावर आला असून आता त्यावर सोमवारी (आजझ) राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
sachin pilot सचिन पायलट यांच्यासोबतच काँग्रेसच्या १९ आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आलेल्या नोटिशीवर आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाकडून सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं पायलट आणि गेहलोत यांच्यातील सत्तासंघर्ष एका रंजक वळणावर आला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली हती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दरम्यान, उच्च न्यायालयानं मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये तसंच त्यांना अपात्र ठरु नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळं सचिन पायलट यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरला.
काँग्रेसच्या १९ आमदारांकडून करण्यात आलेल्या बंडखोरीमुळं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा पायलट यांनी केला होता. ज्यानंतर पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना पक्षात परत आणण्यासाठी काँग्रेसनं सर्वतोपरिनं प्रयत्न केले. पण, या प्रयत्नांना यश न अल्यामुळं आता हा तिढा आणखी वेगळ्या वळणावर पोहोचू नये यासाठी गेहलोत यांच्या समर्थक गटात असणाऱ्या आमदारांची रवानगी एका ह़ॉटेलमध्ये करण्यात आली आहे. एकंदरच दर दिवसाआड राजस्थानमधील या राजकीय खेळीत एक नवा डाव टाकला जात आहे, त्याच्या निकालस्वरुपी आता हाती नेमकं काय येणार यावरच साऱ्याच देशाचं लक्ष आहे.