हाय अलर्ट ! भारतातील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

पोलिसांकडून हाय अलर्ट...

Updated: Jun 6, 2018, 03:16 PM IST
हाय अलर्ट ! भारतातील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

नवी दिल्ली : भारतातील अनेक मोठ्या धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लश्करचा एरिया कमांडर अबू शेखच्या नावावर पाठवलं गेलेलं पत्र हाती लागल्याने हा खुलासा झाला आहे. या पत्रामध्ये अयोध्या, वाराणसी आणि मथुरा या सारखी धार्मिक स्थळं दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहेत.

6 जून ते 10 जून दरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सध्या राज्यात हायअलर्ट जारी केला आहे. पोलिसांना सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याचे आदेश देण्य़ात आले आहेत.

या पत्रात जम्मू-काश्मीरमधील एलईटीचा कमांडर मौलाना अबू शेख याची सही आहे. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाने जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील हाजिन सैन्य शिबिरावर हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.