मुंबई : देशातील दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने येत्या 20 सप्टेंबरपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की 3000 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ करणार आहेत.
कमोडिटी किंमतींमध्ये वाढ
कमोडिटीच्या (स्टील, तांबे आणि इतर) किंमतींमध्ये वाढ झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या रेंज मोटरसायकल आणि स्कूटरसाठी हा निर्णय लागू असणार आहे. याशिवय कंपनीला येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहनांची मागणी चांगली राहण्याची आशा आहे.
मार्चमध्येही वाञल्या होत्या किंमती
हिरो मोटोकॉर्पने याआधी मार्च आणि जुलै महिन्यात किंमतींमध्ये वाढ केली होती. जुलै महिन्यात 3000 रुपयांनी वाढ केली होती. तेव्हाही कंपनीने कमोडिटीमध्ये झालेल्या वाढीमुळे किंमती वाढवत असल्याचे म्हटले होते.