मुंबई : Hero MotoCorp, भारतातील सर्वात मोठी टु व्हिलर उत्पादक कंपनीने लवकरच त्यांच्या सर्व मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 4 जानेवारी 2022 पासून दुचाकींच्या किमतीत 2,000 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे, ही वाढ बाजारपेठ आणि मॉडेलनुसार बदलू शकते.
टु व्हिलर उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, किंमतींमध्ये वाढ झाल्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.
गेल्या 6 महिन्यांत तिसर्यांदा किमती वाढल्या
Hero MotoCorp ची गेल्या 6 महिन्यांत दुचाकींच्या किमती वाढवण्याची ही तिसरी घोषणा आहे. कंपनीने शेवटच्या वेळी म्हणजेच 1 जुलै 2021 रोजी सर्व मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 3000 रुपयांनी वाढवल्या होत्या.
30 सप्टेंबरला दुसऱ्यांदा सर्व दुचाकींच्या किमती वाढवल्या होत्या आणि तरीही ही रक्कम 3000 रुपये होती.
हे देखील वाचा - Important Alert | थेट तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या 5 गोष्टी; आताच करा पूर्ण
मागील दोन्ही किमती वाढण्याचे कारण देखील कंपनीने कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींना दिले होते. Hero व्यतिरिक्त, Kawasaki आणि Ducati ने देखील नवीन वर्षात भारतीय बाजारात किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
नवीन वर्षात किमती वाढवणे हा ट्रेंड
या कंपन्यांशिवाय, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टोयोटा, फोक्सवॅगन, स्कोडा, सिट्रोएन, होंडा कार्स इंडिया, रेनॉल्ट, महिंद्रा आणि महिंद्रा यांसारख्या इतर वाहन निर्मात्यांनीही जानेवारी 2022 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा - SBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश
नवीन वर्ष येताच सर्वच कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा ट्रेंड बनवला आहे आणि सर्व उत्पादक नवीन वर्षात केवळ हवाला देऊन त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवतात. उत्पादन खर्चात होणारी वाढ, याशिवाय कोविड-19 महामारीमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊनही कंपन्या हा निर्णय घेत आहेत.