श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अचानक वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही तासांत पारा कमालीचा घसरला असून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार हिमवृष्टी झाली.
या हिमवृष्टीमुळे विविध ठिकाणी रस्त्यावर बर्फ साचल्याचे दिसून आलं. यामुळे जम्मू काश्मीरशी अनेक भागांशी संपर्क तुटलाय. जम्मूला राजौरी-पूँछ मार्गे काश्मीरला जोडणारा ऐतिहासिक मुगल रोड आणि बांदीपोर-गुरेज मार्ग बंद पडला होता.
संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पंतिहालमध्ये भूस्खलन आणि जवाहर टनल इथं बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला. हिमवृष्टीमुळे विमान सेवेवरही परिणाम झाला. येत्या काही तासांत आणखी हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.