नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचल्यानं ठिकठिकणी वाहतूक कोंडी बघयाला मिळाली. दरम्यान, पावसचा जोर आणखी २४ तास कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. यामुळं राजधानी डेहराडूनमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय.
शेरशाहा मार्ग, मथुरा मार्ग, पुराना किला मार्ग, तीन मूर्ती लेन, अशा अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी खोळंबले. संसद परिसर , सीव्हिल लाईन्समध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले. पावसचा जोर आणखी २४ तास कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरुय. यामुळं राजधानी डेहराडूनमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. डेहराडून आणि तेहरी सीमेवर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतायत. डोंगरावरुन पाण्यासह दगडंही कोसळतायत. मोठमोठाले दगड पाण्यासोबत खाली येत असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होतेय.
जोरदार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यामुळे आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.