गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचं काँग्रेसला समर्थन

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देणार आहे.

Updated: Nov 2, 2017, 07:37 PM IST
गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचं काँग्रेसला समर्थन  title=

अहमदाबाद : पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देणार आहे. काँग्रेसनं पाटीदार समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिल्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं हार्दिक पटेल म्हणाला आहे.

गुजरातमध्ये सत्ता आली तर पाटीदार समाजाला आरक्षण कसं देणार हे काँग्रेसनं स्पष्ट करावं, असा अल्टिमेटम हार्दिक पटेलनं काँग्रेसला दिला होता. यानंतर अहमदाबादमध्ये काँग्रेस नेते आणि पाटीदार नेत्यांची भेट झाली. सत्ता आली तर आरक्षणाबाबत कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन योग्य पाऊल उचलू, असं आश्वासन काँग्रेस नेत्यांनी दिलं होतं.

काँग्रेसकडून ठोस आश्वासन मिळालं नसलं तरी हार्दिक पटेलनं पाटीदार समाजाला भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिकनं याबाबत वक्तव्य केलं आहे. नागरिक समजदार आहेत. मी भाजपविरोधात मतदान करायला सांगितलं म्हणजे नक्की कोणाला मतदान करायचं हे जनतेला माहिती आहे, असं हार्दिक म्हणालाय.