बॉलिवूड स्टार्सना देखील मागे टाकलं या IPS अधिकाऱ्याने

 गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका फिट आणि सुदृढ पोलिस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो कोणत्या सिनेमातील नटाचा नाही. तर हा फोटो आहे एका खऱ्याखुऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 8, 2017, 03:54 PM IST
बॉलिवूड स्टार्सना देखील मागे टाकलं या IPS अधिकाऱ्याने  title=

मध्य प्रदेश :  गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका फिट आणि सुदृढ पोलिस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो कोणत्या सिनेमातील नटाचा नाही. तर हा फोटो आहे एका खऱ्याखुऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा.

गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय पोलिस अधिकारी आणि त्या संपूर्ण व्यवस्थेवर अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. यामध्ये दंबग सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन आपल्याला दिसले. त्यांचा सिनेमातील फिटनेस आणि या खऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा खरा फिटनेस नक्कीच अचंबित करणारा आहे. या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे सचिन अतुलकर.
 
२२ व्या वर्षी सचिन अतुलकर आयपीएस पदावर रूजू झालेल्या सचिन अतुलकरची जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत पोलिस अधिकारी आपण सिनेमातच फिट पाहिले आहेत. पण सचिन अतुलकर यांनी याला भेद दिला आहे. सध्या सचिन अतुलकर कुठेही गेले की अनेक तरूण- तरूणी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास आतुर असतात. सध्या मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये कामावर रुजू झाला आहे. शारीरिक सुदृढतेसोबतच त्याने खेळांमध्येही नैपुण्य मिळवलं आहे. काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आयपीएस ट्रेनिंगच्या दिवसांमध्ये सचिनला घोडेस्वारी आवडू लागली. त्याच्या याच आवडीमुळे २०१० मध्ये घोडेस्वारीमध्ये त्याला सुवर्णपदकही मिळालं होतं. सचिन सध्या अनेकांच्याच चर्चेचा विषय ठरत असून त्याच्या फेसबुक पोस्टवरही बऱ्याच कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेक फॉलोअर्सनी त्याच्या कामाचंही कौतुक केलं आहे. सर्वात फिट आणि देखणा आयपीएस. एवढ्या बिझी शेड्युलमध्ये देखील आयपीएस अतुल आपल्या फिटनेसवर खास लक्ष देतात. बिझी शेड्युलमधूनही ही व्यकती दररोज योगा करताना दिसते. 

जाणून घेऊया या यंग फिट आयपीएस अधिकाऱ्याबद्दल.... 

१) सचिन अतुलकर २००७ सालच्या बॅचमधून पासआऊट झाला आहे. त्यावेळी तो फक्त २२ वर्षाचा होता. २२ व्या वर्षी आयपीएस झाला आहे. 
२) सचिन अतुलकरने दिलेल्या माहितीनुसार त्याने ग्रॅज्युएशन नंतरच आयपीएससाठी परिक्षा दिली. आणि तो पहिल्या परिक्षेतच पास झाला. 
३) सचिन अतुलकरचा जन्म भोपालमध्ये झाला असून त्याचे वडिल फॉरेस्ट सर्व्हिसमधून रिटायर झाले असून भाऊ देखील मिलेट्रीमध्ये आहे. 
४) सचिन अतुलकर १९९९ मध्ये राष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळलेला आहे. तर २०१० मध्ये त्याला गोल्ड मेडल देखील मिळालं आहे. 
५) सचिन अतुलकरच्या मते त्याने आयपीएसच्या परिक्षेसोबतच आपल्या फिटनेसवर लक्ष दिलं आहे. 
६) सचिन अतुलकरने जेव्हा बॉडी बिल्डिंग शिकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उत्तम कोच मिळाले. आणि त्यामुळेच त्याला ते शक्य झालं. तो दररोज एक्सरसाइज आणि योगा दोन्ही करतो. 
७) सचिन अतुलकरच्या मते एक्सरसाइज केल्याने त्याचा स्ट्रेस दूर होतो तर योगा केल्यामुळे माइंड कायम फ्रेश राहतं. आणि तो यामुळे कामात अधिक चांगल लक्ष देऊ शकतो. 

असं असतं सचिन अतुलकरचं फिटनेस शेड्युल 

सात दिवसांचं असं प्लानिंग करतो आयपीएस सचिन अतुलकर 
१) चेस्ट आणि ट्राइशेप एक्सरसाइज करतो 
दिवस २ - बॅक आणि ट्राइशेप एक्सरसाइज करतो 
दिवस तिसरा - या दिवशी काही प्रमाणात कार्डिओचा देखील सहभाग असतो 
दिसव चौथा - लेग्ससाठी स्ट्रेचिंग आणि या दिवशी रिलॅक्सिंग केलं जातं. 
दिवस पाचवा - काही कार्डिओ एक्सरसाइज देखील या दिवशी केलं जातं. 
दिवस सहावा - या दिवशी आपल्या शरिरातील सर्वात विक पार्टला वेळ दिला जातो. 
दिवस सातवा - या दिवशी पूर्णपणे आराम घेतला जातो.