देशातील मुसलमानांमध्ये असुरक्षितता आणि भीतीची भावना - हमीद अन्सारी

देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना असल्याचं वक्तव्य देशाचे मावळेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 10, 2017, 10:17 AM IST
देशातील मुसलमानांमध्ये असुरक्षितता आणि भीतीची भावना - हमीद अन्सारी title=

नवी दिल्ली : देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना असल्याचं वक्तव्य देशाचे मावळेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. 

देशामध्ये असहिष्णुतेचा आणि कथित गोरक्षकांचा मुद्दा तापलेला असताना हमीद अन्सारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. हमीद अन्सारी यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ गुरुवारी पूर्ण होत आहे. 

हमीद अन्सारी यांनी म्हटले की, असहिष्णुतेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे.

राज्यसभा टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतीत हमीद अन्सारी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्हाला जी चिंता वाटत आहे त्या संदर्भात तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवलं आहे का? यावर हमीद अन्सारी यांनी होय असे उत्तर दिलं. 

मुस्लिम समुदयासंदर्भात विविध वक्तव्य केले जात आहेत आणि त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे. या प्रश्नावर हमीद अन्सारी यांनी म्हटलं की, मी हे देशातील विविध भागांमध्ये ऐकलं होतं. यासंदर्भात मी उत्तर भारतात अधिक ऐकलं आहे. चिंतेचं वातावरण आहे आणि असुरक्षिततेची भावनाही निर्माण झाली आहे.