पोलीस स्टेशनमध्येच पार पडला महिलेचा हळदी समारंभ, कारण देत पोलीस अधिकारी म्हणाले...

प्रतापगड जिल्ह्यातील अर्नोद उपविभाग मुख्यालयातील पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला

Updated: May 11, 2022, 05:23 PM IST
पोलीस स्टेशनमध्येच पार पडला महिलेचा हळदी समारंभ, कारण देत पोलीस अधिकारी म्हणाले... title=

मुंबई : पोलिस स्टेशन म्हटलं की, लोकांच्या अंगावर काटा उभा रहातो. येथे जायचं म्हटलं तरी, भल्याभल्याची बोलती बंद होते. कारण पोलिसांच्या हातात एखादी गोष्टी आली की, ते त्याचा पाठ पुरावा केल्याशिवाय कोणालाही सहजासहजी सोडत नाही. तसे पाहाता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हेगारांशी संबंधित प्रकरणांशिवाय दुसरे काही असू शकतं याचा विचार आपण कधीही करु शकणार नाही. परंतु एका पोलीस ठाण्यात वेगळाच प्रकार घडला आहे.

प्रतापगड जिल्ह्यातील अर्नोद उपविभाग मुख्यालयातील पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

खरंतर प्रतापगड जिल्ह्यातील अर्नोद उपविभाग मुख्यालयातील पोलीस ठाण्यात लग्नाच्या रजेवर जाणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला.

पोलीस ठाण्याचे सीआय अजयसिंग राव आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच या महिला कर्मचाऱ्याचा हळदी समारंभ करून कॉन्स्टेबलला लग्नाच्या शुभेच्छा देऊन रजेवर पाठवले.

या महिला कॉन्स्टेबल नववधूचे 13 मे रोजी लग्न होणार आहे. ती तिच्या लग्नाआधी तिच्या घरी निघणार होती, पण पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी तिच्यासाठी अनोखे सरप्राईज प्लॅन केले होते. लग्नाच्या रजेवर जाण्यापूर्वी सीआय अजय सिंग राव यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यातच हळदीचा कार्यक्रम करून महिला कॉन्स्टेबलची रजा मंजूर केली.

लग्नघरात हळदी समारंभामुळे उत्सवाचे वातावरण सुरू होते. घरोघरी वधू-वरांना हळद लावण्याबरोबरच गाणी गायली जातात आणि लग्नसोहळा साजरा केला जातो. पण लेडी कॉन्स्टेबल नागूच्या लग्नाचा जल्लोष तिच्या कार्यरत पोलीस ठाण्यातून सुरू झाला.

या घटनेबद्दल सांगताना सीआयडीचे स्टेशन अधिकारी अजय सिंह राव म्हणतात की, "महिला कॉन्स्टेबल नागूच्या लग्नाची माहिती मिळताच आम्ही ताबडतोब तिच्या हळदी समारंभाचे नियोजन केले. ती ड्युटी करत होती, आम्ही सगळ्यांनी तिला आश्चर्यचकित केलं. पोलीस ठाण्यात हळदीचा विधी झाल्यानंतर आता पुन्हा नागूच्या गावात लग्नाच्या पूर्ण विधी पार पडतील."