शु्क्रवारी सकाळी गुजरातमधील (Gujarat) सुरत शहरामध्ये पोलिसांना (Police) नोटांचा मोठा साठा सापडल्याची माहिती समोर आली होती. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या नोटांचे मूल्य 25 कोटी 80 लाख रुपये इतके असल्याचं समोर आलं आहे.
गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी या कारवाईसंदर्भात माहिती दिली होती. मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवलं आणि तपासणी केली या रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या पोलिसांना आढळून आल्या. या नोटांवर रिझर्व्ह बँक (RESERVE BANK OF INDIA) ऐवजी रिव्हर्स बँक (REVERSE BANK OF INDIA) असं छापण्यात आलं होतं. तसेच त्याच्याच खाली MOVIE SHOOTING PURPOSE ONLY असंही लिहीण्यात आलं होतं.
Surat, Gujarat |On basis of inputs received by Kamrej police, an ambulance was intercepted on Ahmedabad-Mumbai road. On questioning driver & checking vehicle, 6 cartons containing 1290 packets of Rs 2000 counterfeit notes worth Rs 25.80 crores, was found: Hitesh Joysar, SP Rural pic.twitter.com/wWiItpmQpa
— ANI (@ANI) September 29, 2022
मात्र पोलिसांना नोटांची तपासणी करणार असल्याचं म्हटलं असलं तरी पोलिसांनी चूक केल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पोलिसांची ही चूक पडकली आणि याबाबत प्रतिक्रिया दिली.
सुरत पोलिसांच्या या चूकीवर लोकांनी एकाहून एक कमेंट केल्या आहेत. अल्बर्ट अरुल नावाच्या ट्विटर युजरने निवडणुका जवळ आल्याने कामाचा ताण जास्त झालाय, असं म्हटलं आहे.
Performance pressure sir. Election is nearing
— Albert Arul Prakash (@AAPEyes) September 30, 2022
आणखी एका युजरने रिव्हर्स बँक दिसली पण चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असल्याचे दिसलं नाही, असं म्हटलं आहे.
Reverse bank dikh gya inko, Movie shooting purpose nhi dika pic.twitter.com/KhcPX5sfeW
— Rajiv (@Anishh86) September 29, 2022
आरबीआय चित्रपटांसाठी वेगळ्या नोटा छापतेय
Matlab RBI movies ke leya alag sa note bana ra he hai
— Iam DĂDĂ (@DadaHazi) September 29, 2022
मात्र, पोलिसांना सूत्रांकडून चूकीची माहिती दिली गेली किंवा कुणी तरी त्यांची खिल्ली उडवली का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.