Agnipath Yojna : अग्निपथ योजनेअंतर्गत सुमारे 2.5 लाख महिलांनी 100 पदांसाठी अर्ज केले आहेत. यासाठी सुमारे अडीच लाख महिलांनी लष्करी पोलिसांच्या (सीएमपी) सैन्य दलात 100 भरतीसाठी नोंदणी केली आहे. त्यांच्या भरतीसाठी 11 रॅली होणार असून या रॅली ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. (agnipath yojana 2.5 lakh women applied for 100 posts 82000 women in navy)
लष्कराकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, लष्करी भरतीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करी पोलीस दलातील (CMP) केवळ 100 रिक्त पदांसाठी 2.5 लाख महिलांनी नोंदणी केली आहे.
CMP ही एकमेव शाखा आहे जी सैन्यात अधिकाऱ्यांच्या खालच्या पदांवर महिलांची भरती करते. या महिला लष्करी पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रण आणि तपास यासह दहशतवादविरोधी, औपचारिक आणि पोलिसांच्या नियोजनामध्ये त्यांची ड्युटी लावली जाणार आहे.
नौदलात 82 हजार महिलांची नोंदणी
2020 मध्ये लष्करी पोलिस दलाच्या पहिल्या तुकडीची भरती झाल्यानंतर कोविड महामारीमुळे त्याच्या दुसरी भरती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
भारतीय नौदलाने जून 2022 मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत प्रत्येक शाखेत महिला खलाशांची भरती करण्याची घोषणा केली होती. नौदलात अग्निवीर योजनेसाठी सुमारे 10 लाख उमेदवारांनी अर्ज केले असून त्यापैकी 82,000 महिला आहेत. महिलांच्या भरतीची घोषणा करताना नौदलाने सांगितले होते की, सध्या 30 महिला अधिकारी युद्धनौकांवर तैनात आहेत. जून 2022 पर्यंत, भारतीय सशस्त्र दलातील अंदाजे 70,000 अधिकार्यांपैकी महिलांची संख्या केवळ 3,904 होती (लष्कर 1,705, भारतीय हवाई दल 1,640 आणि नौदल 559)