Shocking News : गुजरातच्या (Gujarat News) सूरतमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. 14 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या परत येण्याची आशा सोडली होती. मात्र 36 तासांनी मुलगा जीवतं असल्याचे कळताच घरच्यांना आनंदाचा धक्का बसला. समुद्रात बुडालेल्या या मुलाला मासेमारीसाठी गेलेल्या लोकांनी बोटीतून किनाऱ्यावर आणलं होतं. नवसारीतील (Navsari) समुद्रात मच्छीमारांना सापडला तेव्हा मुलाचा श्वास सुरु होता. महत्त्वाची बाब म्हणजे एका विसर्जन केलेल्या गणपतीच्या (Ganpati) मूर्तीच्या आधारे हा मुलगा सुमद्रात तरंगत होता.
सुरतमध्ये पाचवीत शिकणारा लखन डुमास बीचवर मंदिरात दर्शनासाठी गेला होता. लखन हा मुलगा समुद्रात पोहोचला आणि गणेशमूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी खोल पाण्यात गेला. मात्र तो परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा शोध घेणे सुरुच ठेवले होते. मात्र तो कुठेच सापडला नाही. तो आता जिवंत नाही असेच सर्वांना वाटत होतं. पण नंतर चमत्कार घडला आणि लखन जिवंत घरी परतला. सुदैवाने खोल समुद्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तीमुळे लखनचा जीव वाचला. लखनने समुद्रात 24 तास मूर्ती धरुन ठेवली होती.
लखन 29 सप्टेंबर 2023 रोजी त्याचा भाऊ करण करण, बहीण अंजली आणि आजीसोबत अंबाजी मंदिरात दर्शनासाठी आला होता. मंदिरात गेल्यावर मुलांनी आजीकडे समुद्रकिनारी जाण्याचा हट्ट सुरू केला. आजी त्यांना डुमास बीचवर फिरायला घेऊन गेली. दोघे भाऊ समुद्राच्या लाटांमध्ये खेळत होते. त्याचवेळी लाटांनी दोघांनाही समुद्रात खेचले. तेवढ्यात सुमद्रावरील लोकांनी करणला वाचवले. मात्र लखन लाटांच्या प्रवाहात वाहून गेला. याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. मात्र समुद्र खवळल्याने त्याचा शोध लागला नाही. लखन जिवंत सापडण्याची आशा कुटुंबीयांनी सोडलून दिली होती.
मात्र 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लखनचे वडील विकास देवीपूजक यांचा नवसारी येथून फोन आला. लखनचे कुटुंबीय नवसारी येथे पोहोचले तेव्हा त्यांना तो जिवंत आणि पूर्णपणे व्यवस्थित असल्याचे आढळले. लखनला कोणतीही दुखापतही झाली नव्हती.
कसा वाचला जीव?
लखन किनार्यापासून 18 नॉटिकल मैल अंतरावर लखन भर समुद्रात तरंगत होता. लखन समुद्रात वाहून गेल्यावर त्याच्या हाती गणेशमूर्तीचे काही अवशेष आले. त्याच्या मदतीने तो तरंगत राहिला. लखन डुमासहून गुजरातच्या नवसारी जिल्ह्याच्या दिशेने वाहत जात होता. नवसारी येथील नवदुर्गा ही मासेमारी करणारी बोट तिथून चालली होती. लखनने हाक मारली आणि हात हलवला. ते पाहून मच्छीमार लगेच तिथे पोहोचे आणि त्यांनी लखनला बोटीत बसवले. लखनला बोटचालकाने जेवण, पाणी आणि चहा दिला आणि त्याच्या कुटुंबियांना कळवले. यानंतर पोलिसांनी लखनच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्याच्या स्वाधिन केले.