नवी दिल्ली : ज्यांना टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायची असेल तर त्यांना दिवाळीमध्ये बंपर सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनि्स गुड्स रिटेलर हे प्रोडक्ट्स सध्या २० ते ४० टक्के सूट देऊन विकत आहेत.
जीएसटी लागू होण्यापूर्वी विक्रेत्यांना जुना स्टॉक काढायचा आहे. त्यामुळे जुन्या स्टॉकवर अधिक टॅक्स लागणार असल्याने जुना स्टॉक काढण्यावर विक्रेत्यांचा भर आहे. सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
किरकोळ विक्रेत्याने मेपूर्वी खरेदी केलेल्या आणि न विकलेल्या सामानांवर ६ टक्के आणि वर्षभर जुन्या सामानावर १४ टक्क्यांचा लॉस होणार आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते एमआरपीवर १० ते १५ टक्के सूट देतात आता वरील ही सूट तिप्पट होण्याची शक्यता आहे.
सॅमसंग, पॅनासॉनिक, हिताची आणि व्हिडिओकॉन सारखे ब्रँडही सेल्स वाढविण्यासाठी गिफ्टपासून एक्सटेंडेड वॉरंटीपर्यंत ऑफर देत आहेत. तसेच डिस्ट्रीब्युटरने सध्याचा स्टॉक क्लिअर होईपर्यंत नवा माल उठविणे बंद केले आहे.