लग्नमंडपात नवरदेवाकडून पत्नीचा सर्वांसमोर अपमान, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नव्या जोडप्याची चर्चा 

Updated: Oct 1, 2021, 11:42 AM IST
लग्नमंडपात नवरदेवाकडून पत्नीचा सर्वांसमोर अपमान, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग title=

मुंबई : लग्न म्हटलं की सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. नवीन नवरदेव आणि नवरीच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याला सुरूवात करणार म्हणून आनंद तर असतोचं  पण मनात थोडं दडपण देखील असतं. सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे  लग्नातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. खरं तर नवं नातं फक्त आणि फक्त आदर आणि विश्वासाच्या जोरावर उभं राहतं. पण या लग्नात तर भरमंडपात नवरदेवाने होणाऱ्या पत्नीचा अपमान केला. 

सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लग्नमंडपात नवरदेव आणि नवरी उभे आहेत. संपूर्ण मंडप पाहुण्यांनी भरलेलं आहे. तेव्हा नवरी तिच्या होणाऱ्या पतीला पेढा भरवण्यासाठी हात पुढे करते. पण नवरदेवर त्याच्या होणाऱ्या पत्नीकडे वळून देखील पाहात नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. नवरदेवाने भरमंडपात नवरीचा केलेला अपमान पाहून तुम्हाला देखील राग येईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर लग्न कार्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हा व्हिडिओ 'एक मोहोब्बत ऐसी भी' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.