मुंबई : डिफेंस सेक्टरमधील कंपनी पारस डिफेंस ऍॆड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअरची आज बाजारात लिस्टिंग झाली. हा शेअर इश्यू प्राइजच्या तुलनेत बीएसईवर 171 टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्ट झाला आहे. पारस डिफेंसने आयपीओच्या शेअरची किंमत 175 रुपये ठेवली होती. हा शेअर आज 475 रुपयांवर लिस्ट झाला आहे. म्हणजेच प्रति शेअरवर 300 रुपयांचा भरघोस परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. परंतु आता लिस्टिंग नंतर हा शेअर होल्ड करावा की, विकावा याबाबत आमची सहयोगी वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी यांनी सल्ला दिला आहे.
अनिल सिंघवी यांनी म्हटले की, पारस डिफेंसचा स्टॉक लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता. फंडतर्फे शेअर्समध्ये खरेदी झाल्यास शेअरमध्ये आणखी तेजी येऊ शकते. शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी 350 रुपयांचा स्टॉप लॉस लावून होल्ड करणे योग्य राहील.
पारस डिफेंस एअरोस्पेस सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. कंपनीचे प्रमोटर्स अनुभवी आहेत. आणि मॅनेजमेंटमध्ये डिफेंस आणि एअरोस्पेस सेक्टरमधील अनुभवी लोक आहेत.
कंपनीचे निगेटिव्ह फॅक्टर
पारस डिफेंस कंपनीची साइज कमी आहे. कंपनीचा 600 ते 650 कोटीपर्यंत मार्केट कॅप बनेल. कंपनीचा रेवेन्यू 150 कोटींचा आहे. 300 कोटी रुपयांची ऑर्ड़र बुक आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला आर्थिक उभारी मिळेल.