आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 17, 2023, 11:52 AM IST
आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य  title=

Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले.

दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. 

दोन्ही बहिणींना आजोबांच्या या कृतीचा खूप राग आला. या रागाच्या भरातच दोन्ही बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील व परिसरातील लोक हादरले आहेत. दोन्ही बहिणी एका मुलाशी गुपचूप बोलायच्या असे सांगितले जात आहे. दरम्यान कुटुंबीयांनी अज्ञात तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खुशबू आणि शालिनी अशी मृत बहिणींची नावे सांगण्यात येत आहेत.

दोन्ही चुलत बहिणींचे एका मुलासोबत फोनवर संभाषण

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू आणि शालिनी या दोघी बहिणी एकत्र राहत होत्या. खुशबूचे आई-वडील कुठेतरी काम करतात आणि ती तिच्या काका, काकू आणि आजोबांसोबत अलीगढमध्ये राहत होती. 

शालिनीच्या वडिलांनी सांगितले की, 'खुशबूची एका मुलीशी मैत्री होती आणि त्याने तिला मोबाईल दिला होता. माझ्या वडिलांनी दोघींना (खुशबू आणि शालिनीचा ) मोबाइलवर कोणत्या तरी मुलाशी बोलताना पाहिले. यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला. दोघींनाही मोबाईल घेतल्याचा राग आला.

यानंतर दोघांनी घरी येऊन गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या माहितीनंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आधी दोघी नियमित शाळेत जायच्या पण गेल्या काही दिवसांपासून दोघींनी शाळेत जाणे बंद केले होते, असे पोलिसांनी सांगितले. 

सध्या दोघींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ही घटना समोर आल्याने शेजारी आणि आजूबाजूचे लोक हैराण झाले आहेत. दोन मुलींच्या मृत्यूने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

कुटुंबीयांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल 

खुशबू आणि शालिनीच्या पालकांनी अज्ञाताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही बहिणी एका तरुणाशी बोलत होत्या, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या दोघांकडे हा मोबाईल कधी आणि कोणी दिला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मोबाईल फोनमुळे दोन चुलत बहिणींनी आत्महत्येसारखे भयंकर पाऊल ऊचलल्याने शहरात खळबळ उडाली आहे.