नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा तूर, मूग, उडीद , हरबरा शेतक-यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
डाळीवरची बंदी उठवल्यामुळं देशांतर्गत कडधान्य उत्पादक शेतक-यांच्या मालाला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.