NIAची कारवाई, बनावट नोटांसह चौघांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कारवाई करत नकली नोटांसह चार जणांना अटक केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 16, 2017, 04:29 PM IST
NIAची कारवाई, बनावट नोटांसह चौघांना अटक  title=
Representative Image

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कारवाई करत नकली नोटांसह चार जणांना अटक केली आहे.

एनआयएने गुरुवारी कोलकातामध्ये कारवाई करत चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ९.१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

एनआयएने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, सर्वच्या सर्व चारही आरोपींना कोलकातामधील हावडा रेल्वे स्थानकातून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

मंगळवारी एनआयएला माहिती मिळाली होती की, काही व्यक्तींकडे भारतीय चलनातील बनावट नोटा असून त्या इतर ठिकाणी पाठवण्यात येत आहेत.

त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांची एक टीम या आरोपींना पकडण्यासाठी बनवण्यात आली. रात्री उशीरा एनआयएच्या या टीमने सापळा रचत ही कारवाई केली आहे. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २,००० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

बरकत अंसारी, उत्पल चौधरी, फिजूल मियाँ आणि रबजुल मिया असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.