मुंबई : तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो? अॅसिडिटीवर तुम्ही औषधं घेता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. ही औषधं तुम्हाला तात्पुरता आराम देतील. भविष्यात ती तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात, कशी? पाहूयात हा रिपोर्ट. अॅसिडिटीसारख्या लहान मोठ्या आजारांवर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत असाल, तर सावधान. (government drops 26 drugs from essentials list over cancer causing know details)
कारण अॅसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळं तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. अशाप्रकारच्या तब्बल 26 औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातलीय. जीवनावश्यक औषधांच्या यादीतून ही २६ औषधं वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.
रॅनिटिडीन हे त्यापैकीच एक औषध. अॅसिडिटीसाठी ते सर्रास वापरलं जातं. २०१९ साली अमेरिकेनं त्यावर बंदी घातली, तेव्हापासून भारतातही त्याची काटेकोर पडताळणी सुरू होती. या औषधामध्ये कॅन्सर निर्माण करणा-या एन नायट्रोसोडीमिथाइलमाइनचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आढळलं. त्यामुळं
रॅनिटिडीन (Ranitidine)
अल्टेप्लेस (Alteplase)
एटेनोलोल (Atenolol)
ब्लिचिंग पाउडर (Bleaching Powder)
कॅप्रोमाइसिन (Capreomycin)
सेट्रिमाइड (Cetrimide)
त्यामुळं तुम्ही देखील आता काळजी घ्या. अॅसिडिटीचा त्रास असेल तर नेमकी कोणती औषधं घ्यायची, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.. नाहीतर तुमचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.