Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?

Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं.   

Updated: Feb 17, 2023, 12:03 PM IST
Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?  title=
Google India Layoffs 453 epmloyess from diffrent departments latest Marathi news

Google Layoff News : जागतिक आर्थिक मंदीला (Recession) केंद्रस्थानी ठेवत 2022 या वर्षापासूनच अनेक संस्थांनी मोठ्या संख्येनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. Amazon, Twitter यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यात आता आणखी एका जगप्रसिद्ध कंपनीचा समावेश झाला आहे. ही कंपनी म्हणजे गुगल (Google). 

सूत्रांच्या माहितीनुसार गुगल इंडियाकडून रातोरात विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 453 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गुगल इंडियाचे Country Head आणि Vice President संजय गुप्ता यांच्या नावे कर्मचाऱ्यांना एका Email च्या माध्यमातून त्यांची नोकरी गेल्याची माहिती देण्यात आली. 

कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या सुरुवातीलाल देण्यात आलेले Layoff चे संकेत

2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच गुगलकडून यंदाच्या वर्षात साधारण 12000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याचे संकेत दिले होते. जागतिक आर्थिक मंदीमुळंच गुगलकडून हा निर्णय़ घेण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. गुगलकडून करण्यात आलेली ही कर्मचारी कपात नव्यानं करण्यात आली आहे, की पूर्वनियोजित नोकरकपातीला सुरुवात झाली आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

हेसुद्धा वाचा : Sundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा'

Sundar Pichai यांच्या पगारावरही थेट परिणाम 

गुगलमध्ये झालेल्या कर्मचारी कपातीची चर्चा असतानाच आता सीईओ Sundar Pichai यांच्यावरही याचे थेट परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्या पगारातही मोठी कपात अपेक्षित आहे. हल्लीच झालेल्या एका Town Hall Meeting दरम्यान त्यांनी कंपनीतील senior vice president पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या Bonus वरही याचा परिणाम होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. 

दरम्यान, LinkedIn वरून गुगलमधील या कर्मचारी कपातीवर शिक्कामोर्तब झालं. जिथं कंपनीतील account manager कडून नोकरी गमावण्याची पोस्ट करण्यात आली. 'Hii... गुगल इंडियाच्या कर्मचारी कपातीचा फटका मलाही बसला आहे. गुगलमध्ये माझं संपूर्ण लक्ष विविध क्षेत्रांतील डिजिटल मार्केटिंगवर होतं', असं सांगत कर्मचाऱ्यानं नव्या नोकरीसाठी तातडीनं शोधाशोधही सुरु केली आहे.