रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून मोठी घोषणा

Railways passengers travel : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. (Railway Travel News)  

Updated: Nov 17, 2021, 01:53 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून मोठी घोषणा title=

मुंबई : Railways passengers travel : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. (Railway Travel News)  रेल्वे तिकीट दरात वाढ (Train ticket rates) करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच प्रवाशांना 999 रुपयांत एसी पॉडमध्ये राहण्याचीही सोय करणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांनी केली आहे.

 रेल्वे प्रवाशांसाठी चांगला प्रवास व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. चांगली सुविधा देत असताना याचा भार तिकीट दरावर पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्याचा विचार नाही, असे दानवे म्हणाले. एसी पॉडमध्ये राहण्याची सुविधा करणार आहोत. तेही 
999 रुपयात प्रवाशांना राहता येणार आहे. तसेच रेल्वेत स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य, देण्यात येत आहे, असे दानवे यावेळी म्हणाले.

आज रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.2014 ला सरकार स्थापन झाले त्यानंतर या देशात रेल्वेत अनेक नवीन कल्पना आल्यात. मुंबईत दररोज 70 लाख लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. प्रवास सोपा कसा होईल त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. 1 हजार रुपयात आम्ही मुंबई सेंटरला राहण्याची सोय केली आहे. 130 कोटी रुपयांच्या नवीन सुविधा आम्ही सुरू केल्या आहेत.  भविष्यात आणखी योजना सुरू करू आणि नॉर्थ इंडियामधील राज्य आम्ही जोडण्याचा प्रयत्न करु, असे दानवे यावेळी म्हणाले. 

 इंधन दरवाढीबाबत वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान,  रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महागाईबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. देशातील पेट्रोल-डिझेल याच्या किंमती अमेरिकेत ठरतात. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल याच्या किंमती वाढवत नाही. त्यामुळे दरवाढीवरुन आमच्यावर आरोप करणे चुकी आहे, असे अजब स्पष्टीकरण इंधन दरवाढीवर दानवे यांनी दिले आहे. औरंगाबादेत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  देश केंद्र (Petrol Diesel Prices Hike) सरकारच्या पैसावर चालत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.