Gold-Silver Price on 22 May 2023 : सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या (gold-silver price) दागिन्यांची खरेदी होत असते. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढत होती. मात्र, आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सराफ बाजारात 22 मे रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 रुपये 60,530 रुपये आहे. तर चांदीचा भाव 79,000 रुपये किलो आहे.
सराफा व्यापारी असोसिएशन आणि भारतीय बुलियन ज्वेलर्सिएशनमध्ये आज सोने-चांदीचे दर (gold-silver price) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही चांदी 79,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (रविवारी) चांदीचा दर असाच होता. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 भाव काल 57,650 रुपये होता. एकंदरीत सोने-चांदीच्या दरात (gold-silver price) आजही स्थिरता दिसून येत आहे. रविवारी लोकांनी 60,530 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने 24 कॅरेट सोने खरेदी केले तर आजही त्याची किंमत 60,530 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
भारतीय लोकांना सोने-चांदीचे मोठे आकर्षण आहे. सण, उत्सव आणि समारंभात लोक आवर्जून सोनं खरेदी करतात. तसेच सोन्याकडे गुंतवणुकांचा एक उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जातं. अनेकजण सोन्यात व्यापारी असतात. त्यातच पुढील काळात सोन्याची किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सोने गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो.
देशाची राजधानी दिल्लीतून सोने खरेदी करायचे असेल तर उशीर करू नका, कारण येथे 24 कॅरेट सोने 60,870 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर एक तोळा 55,800 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने 52,285 रुपयांना विकले जात आहे, तर 22 कॅरेटचे सोने 47,927 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. यासह ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सोन्याचा भाव 330 रुपयांनी घसरला. येथे 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 60,870 रुपये नोंदवला गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 55,800 रुपये होता.
जर तुम्ही सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी नवीनतम दराची माहिती मिळवा. येथे शनिवार आणि रविवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सोन्याचे दर जारी केले जातात. सराफा बाजारातील दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल.