Gold Rate Today: लग्नसराईत सोने-चांदीचे दर घसरले की महागले? चेक करा आजचे दर

Gold Silver Price in India: देशभरात विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे मात्र सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. जाणून घ्या आज सोन्याचे दर घसरले की महागले..... 

Updated: Mar 1, 2023, 10:51 AM IST
Gold Rate Today: लग्नसराईत सोने-चांदीचे दर घसरले की महागले? चेक करा आजचे दर title=
Gold Silver Price on 1 March 2023

Today Gold Silver Price in India : देशभरात लग्नसराईचे मुहूर्त असल्यामुळे सोने खरेदीकरांची बाजारपेठेत गर्दी दिसून येते. जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. कारण सराफ बाजारात सोन्याच्या ( Gold Silver Price) किंमतीत कालच्या तुलनेत वाढ झाली असून आद 22 कॅरेट सोन्याचे दर 51,600 रुपये प्रती तोळा आहे तर काल (28 फेब्रुवारी) त्या अंदाजाने 51,500 रुपये प्रती तोळा सोने ( Gold Silver Price) विकले गेले. बघायला गेले तर सोन्याच्या किंमतीतल कालच्या तुलनेत 100 रुपयांनी वाढ झाली आहे. 

दरम्यान केंद्र सरकारने 1 फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे ( Gold Silver Price) दर वाढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बजेटच्या दुसऱ्या दिवशी जीएसरटीसह सोन्याचे 24 कॅरेट दर प्रतितोळा 60,500 रुपये, तर चांदी प्रतिकिलो 70 हजार रुपये (GST) झाली होती. मात्र आता सोन्याचे दर 57,200 रुपये प्रतितोळा (GSTसह) तर चांदी 64,200 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. परिणामी सोने दर 60 हजारांच्या घरात गेल्याने सोने खरेदी नियोजन असलेल्या ग्राहकांनी वेट अँड वॉच चे धोरण स्वीकारले होते. 

वाचा: गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर  

देशातील महानगरांमध्ये सोने चांदीचे दर 

शहर     24 कॅरेट (रु.)           22 कॅरेट (10 ग्रॅम)
दिल्ली  56,170               51,500
मुंबई    56,020                51,350 
चेन्नई    52, 285             47, 927 
कोलकाता    56,020      51, 350  

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.