Gold Rate Today | पुढच्या काही महिन्यांत सोन्याच्या दरांत उसळी;आताच गुंतवणूक करून ठेवा

 भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो. 

Updated: Jul 13, 2021, 01:43 PM IST
Gold Rate Today | पुढच्या काही महिन्यांत सोन्याच्या दरांत उसळी;आताच गुंतवणूक करून ठेवा title=

मुंबई : भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो. सण - समारंभांमध्ये सोन्याचे असलेले महत्व याला कारणीभूत आहेच परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. 

सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. या आठवड्यात हे दर स्थिर होताना दिसत आहेत. सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात प्रति तोळे 400 ते 500 रुपयांची वाढ झाली होती. 

सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचे भाव 47 हजार 895 रुपये प्रतितोळे इतके आहे. तर चांदीच भाव 69 हजार 611 रुपये प्रतिकिलो इतके आहे. 

मुंबईतील सोन्याचे आजचे दर
22 कॅरेट 46 हजार 700 रुपये प्रतितोळे
24 कॅरेट 47 हजार 700 रुपेय प्रतितोळे

मुंबईतील चांदीचे आजचे दर
69 हजार 400 रुपये प्रतिकिलो

ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रतितोळे च्या पुढे गेले होते. येत्या काही महिन्यात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे सोने काही महिन्यात पुन्हा उसळी घेऊन गेल्या वर्षीचा उच्चांक गाठू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.