Gold Rate Today | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याच्या दर घसरले; चांदीचीही चमक उतरली

Gold rate today mumbai : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात घसरण नोदवण्यात आली होती. सध्या सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे सराफा बाजारातही ग्राहकांची वरदळ कमी झाली आहे. 

Updated: Jan 10, 2022, 03:47 PM IST
Gold Rate Today | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याच्या दर घसरले; चांदीचीही चमक उतरली title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात घसरण नोदवण्यात आली होती. सध्या सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे सराफा बाजारातही ग्राहकांची वरदळ कमी झाली आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याच्या दर 47386 प्रति तोळे ट्रेड करीत होते. तर, चांदीचे दर 60531 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते 2020 च्या ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरांनी 55 हजारी प्रतितोळेचा टप्पा गाठला होता. त्या तुलनेत  सोने सध्या स्वस्त मिळत आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर
10 जानेवारी 48,610 रुपये प्रति तोळे
09 जानेवारी 48,610 रुपये प्रति तोळे  
08 जानेवारी 48,600 रुपये प्रति तोळे
07 जानेवारी 48,510 रुपये प्रति तोळे

मुंबईतील चांदीचे दर
10 जानेवारी 60400 रुपये प्रति किलो
09 जानेवारी 60700. रुपये प्रति किलो
08 जानेवारी 60700 रुपये प्रति किलो
07 जानेवारी 60400 रुपये प्रति किलो

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 

24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचा दर जाणून घ्या 

तुम्ही घरबसल्या सहज सोन्याचा दर जाणून घेऊ  शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.