सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवस सोनं आणि चांदीचे दर घसरले.

Updated: Feb 4, 2021, 05:31 PM IST
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई: अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवस सोनं आणि चांदीचे दर घसरले. लग्नाचे मुहूर्त सुरू होत आहेत. त्यामुळे गृहिणी आणि लग्न समारंभाच्या मुहूर्तांवर ही आनंदाची बातमी आहे. येत्या दिवसात पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीमध्ये तेजी येऊ शकते. 

आज बाजारपेठेत सोन्याच्या किंमती पुन्हा कमी झाल्या आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याचे दर 322 रुपयांनी तोळ्यामागे घसरले आहेत. तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. बुधवारी बाजार बंद होत असताना दिल्लीमध्ये 1 तोळ्यासाठी 47,457 रुपये मोजावे लागत होते. 

चांदीसाठी दिल्लीच्या बाजारपेठेत बुधवारी 68,142 रुपये किलोवर चांदीचे दर आले होते. या भावासह बाजारपेठ बुधवारी बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमती घसरल्या, तर चांदी स्थिर राहिली.

दिल्लीतील सराफ बाजारात आज 322 रुपये प्रति तोळा सोन्याचे दर घसरले आहेत. दिल्लीमध्ये सोन्याचा आजचा दर 47,137 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर 1 हजारने घसरला असून 67,170 रुपयांवर आला आहे.

OMG!'या' कारणामुळे लग्नातील फूड मेनूकार्डची तुफान चर्चा

डॉलरच्या तुलनेत आज रुपया 6 पैशांनी मजबूत झाला आहे. अर्थसंकल्पामध्ये सोनं आणि चांदीवरील कस्‍टम ड्यूटी कमी केल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत.