सोनं सलग तिसऱ्या दिवशी महागलं

सोन्याचे भाव पुन्हा वाढले

Updated: Jun 9, 2018, 07:37 PM IST
सोनं सलग तिसऱ्या दिवशी महागलं title=

नवी दिल्ली : जगभरात सोन्याच्य़ा वाढत्या मागणीमुळे सोन्याचा भाव पुन्हा वाढला आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी सोन्याचा भाव वाढला. शनिवारी 100 रुपयांनी सोन्याचा भाव वाढला आहे. सोनं पुन्हा एकदा 32 हजारांच्या वर पोहोचला आहे. शनिवारी 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव 32,050 रुपये होता. चांदीचा भाव देखील 100 रुपयांनी वाढला आहे. चांदी 41,100 रुपये प्रति किलो झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं मजबूत झाल्याने आणि सोन्याची मागणी सराफा बाजारात वाढल्याने सोनं वाढलं आहे. शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं 0.17 टक्क्यांनी मजबूत होत 1,299 डॉलर प्रति औंस झाला तर चांदी 0.60 टक्क्यांनी मजबूत होत 16.77 डॉलर प्रति औंस झाला आहे. 

स्थानिक सराफा बाजारात 99.9 टक्के सोनं आणि 99.5 टक्के सोनं 100-100 रुपयांनी वाढलं आहे. 32,050 रुपये आणि 31,900 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आज होता. मागच्या 3 दिवसांपासून सोनं 350 रुपयांनी वाढलं आहे. चांदी 100 रुपयांनी वाढून 41,100 रुपये प्रति किलो झाली आहे.