छोटासा साप 5 फूट लांब सापावर असा पडला भारी

सोशल मीडियावर दोन सापांमधील लढाई व्हायरल

Updated: Jun 9, 2018, 06:51 PM IST
छोटासा साप 5 फूट लांब सापावर असा पडला भारी title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दोन सापांमधील लढाई व्हायरल होत आहे. तुम्ही दोन सापांमधील लढाई पाहिली असेल पण एका छोट्या सापाने मोठ्या सापाला कसं हैराण केलं हे पाहिलं नसेल. ओडिशामधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 2 सापांमधली ही लढाई पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. हा व्हडिओ ओडिशामधील कोरापूट जिल्ह्यातील आहे. एक 3 फुटाचा साप 5 फुट पेक्षा लांब सापाला कसा धडा शिकवतो हे या व्हि़डिओतून समोर आलं आहे. शुक्रवारी लोकांनी सर्पमित्रांना बोलवलं. तेव्हा ते देखील हे दृष्य पाहून हैराण झालेत.

छोट्या सापाने मोठ्य़ा सापाला धरुन ठेवलं होतं. छोटा साप हा नेहमी मोठ्य़ा सापाचा शिकार होतो पण या व्हिडिओत उलटच पाहिला मिळालं. पाहा व्हिडिओ

via GIPHY

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हाय़रल होतो आहे.