नवी दिल्ली : देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या लग्न सराई असल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. अशात सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक चिंतेत आले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 112 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आज दिल्लीमध्ये 44 हजार 286 रूपये मोजावे लागणार आहेत. मागील व्यापारी सत्रात 10 ग्राम सोन्याचे दर 44 हजार 174 रूपये होते. आज देखील सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरांत होणारी वाढ देशातील गोल्ड ईटीएफएस द्वारे पार पडण्यात येण्याऱ्या भुमिकेवर अवलंबून असते. जेव्हा सोनं ईटीएफ विकत घेतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढतात.
आज 10ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी 43 हजार 960 रूपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट सोन्यासाठी जवळपास 47 हजार 950रूपये मोजावे लागत आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर...
शहर २२ कॅरेट २४ कॅरेट
मुंबई 42 हजार 390 46 हजार 240
नवी दिल्ली 43 हजार 430 47 हजार 960
पुणे 43 हजार 430 44 हजार 430
नागपूर 43 हजार 430 46 हजार 90