सोन्याच्या दरात मोठी घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 9, 2017, 06:31 PM IST
सोन्याच्या दरात मोठी घसरण title=
Representative Image

नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.

सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. म्हणजेच सोन्याचा दर, ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. 

३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी घट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमचा दर ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. आता १० ग्रॅम सोन्याचा दर २९,६५० रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत असल्याचं पहायला मिळत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, स्थानिक बाजारात सोन्याची होणारी मागणी आणि कमी झाली आहे त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

चांदीचा दर वाढला

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना मात्र, चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३७,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १००-१०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: २९,६५० रुपये आणि २९,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात ५०० रुपयांनी घट झाली आहे.

तर, चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३७,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.