मुंबई : सोन्याचे दर सध्या अस्थिर आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 56 हजार रूपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. पण 2021 मध्ये सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली. आज सोन्यासाठी जवळपास 48 हजार रूपये मोजावे लागत आहेत. पण येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये सोन्याचे दर गगनाला भिडतील असं तज्ज्ञांचं मत आहे. Quadriga Igneo fund चे डिएगो पॅरिगो यांनी याबाबत भविष्यावाणी केली आहे.
पुढच्या तीन ते चार वर्षात सोन्याचे दर 3 हजार ते 5 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. जे लोक सोन्यात गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या अंदाजामागील फंड मॅनेजर डिएगोचा तर्क देखील ठोस आहे. ते म्हणतात की सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठू शकतात. कारण गुंतवणूकदारांना अनेक देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या पॅकेजमुळे मध्यवर्ती बँकांना येणाऱ्या अडचणींबद्दल फारशी माहिती नसते.
हे तेच डिएगो आहे ज्यांनी 2016 च्या सुरुवातीला भाकीत केले होते की सोने पाच वर्षात नवीन उच्चांक गाठेल. जगभरातील कोरोना महामारीच्या दरम्यान सोने गेल्या वर्षी 2,075.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तथापी, गेल्या काही दिवसांपासून सोनं 1800 प्रति औंस भोवती फिरत आहे. ते म्हणाले की, आर्थिक आणि वित्तीय धोरणांमुळे होणाऱ्या दीर्घकालीन नुकसानीबाबत फारशी जागरूकता नाही.
डिएगो यांनी सांगितलं की, अमेरिकेत फेडरल रिझर्वच्या पॉलिसीला सक्त निर्देश देवून देखील 2021 सोन्याच्या दरात सतत घट होत आहे. डिएगोचा असा विश्वास आहे की मध्यवर्ती बँकांचं परिस्थितीवर तितकं नियंत्रण नाही जसे लोक विचार करत आहेत. त्यामुले डिएगो म्हणाले माझ्या मतावर ठाम आहे. 3 ते 5 वर्षांमध्ये सोन्याचे दर वाढतील.