मुंबई : देशातील आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने चांदीच्या दरावर होत असतो. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार मंदावल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील सोन्याच्या दरांमध्ये बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ - उताराचा परिणाम भारतीय सोने बाजारावरही होत असतो. भारतीय सोने बाजार MCX नुसार आजच्या दरांमध्ये किंचीत घसरण नोंदवण्यात आली. MCXमध्ये आज सोन्याचा दराची ट्रेंडिग 47951 रुपये प्रति तोळे इतक्या रुपयांवर बंद झाली.
22 कॅरेट 44,910 प्रतितोळे
24 कॅरेट 45,910 प्रतितोळे
चांदीचे दर
71,600 प्रति किलो
सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात घट झाली होती. या आठवड्यात ते दर स्थिर आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे सोने खरेदीकडे लक्ष आहे.
-----------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)