Gold rate today: आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोन्याचे दर वधारले

सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला 

Updated: May 10, 2021, 07:26 PM IST
Gold rate today: आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोन्याचे दर वधारले title=

मुंबई : जागतिक बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोन्याचे दर वधारले आहेत. आज सोन्याच्या दरांत 179 रूपयांनी वाढ झाल्यामुळे आज सोने खरेदीसाठी 47 हजार 452 रूपये मोजावे लागत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.  मागील व्यापारात सोन्याचे दर 47 हजार 273 रूपयांवर बंद झाले. तर दुसरीकडे चांदीचे दर देखील वाढले आहेत, 826 रूपयांच्या उच्चांकासह चांदीचे  दर 71 हजार 541 रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावाबद्दल बोलायचं झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली. 8.95 डॉलरच्या तेजीसह सोने 1,840.25  डॉलर प्रति औस तर चांदी 0.418 डॉलरच्या तेजीसह 27.895 डॉलर प्रति औसवर पोहोतले आहेत. तर दुसरीकडे  IBJAने दिलेल्या माहितीनुसार 14 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 788 रूपयांवर बंद झाले आहेत. 

MCXच्या डिलिव्हरी सोन्याच्या दरात देखील तेजी पाहायला मिळत आहे. 5.40 वाजेच्या सुमारास  276 रूपयांच्या तेजीसह सोन्याचे दर 48 हजार 27 रूपयांवर ट्रेड करत आहे. विश्लेषकांच्या मते जागतिक स्तरावर मागणीतील वाढीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. हाच परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला.